तीन बहिणींनी पहिले गळाभेट केली आणि नंतर तिघींनी रेल्वे समोर उडी घेतली, वाचा नंतर काय झाले !

dawn.com

छत्तीसगढ ची राजधानी रायपूर येथे डब्ल्यूआरएस कॉलनी जवळ एक हृदयद्रावक घटना घडली. शनिवारी संध्याकाळी 3 सख्या बहिणी धावत्या रेल्वे ट्रेनच्या खाली आल्या. तीनही मुली गंभीर जखमी आहे. ट्रेन मध्ये असलेल्या आरपीएफ च्या जवानांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहचवले. या घटनेच्या आधी काही लोकांनी त्यांना एक दुसऱ्याची गळाभेट करताना पाहिले होते, परंतु हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही कि हा एक अपघात होता कि सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न होता. जीआरपी, आरपीएफ सोबतच येथील पोलीस या घटनेची चौकशी करत आहे. माहितीनुसार सीमा बंजारा, निशा बंजारा आणि भगवती बंजारा या तिघी बहिणी रिको या गावच्या रहिवासी आहे. भगवतीचे दोन्ही पाय कापले गेले आहे, सीमा आणि निशा ची परिस्थिती नाजूक आहे. त्यांच्याजवळ एक बॅग मिळाली आहे त्या बॅग मध्ये सिटी बस चे तिकीट होते. तिकिटावर असलेल्या वेळेनुसार त्या दुपारी 12.35 वाजता तेथे पोहोचल्या होत्या.

hi.wikipedia.org

या बहिणींजवळ एक मोबाईल आणि एक लाल रंगाचा टॅबलेट मिळाला आहे त्याच्या मदतीने जीआरपी ने पोलिसांना संपर्क करून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क केला. त्यानंतर समजले कि त्या धनेली येथे आपल्या जीजूंकडे जात होत्या, त्यादरम्यानच त्यांचा अपघात झाला. हि केस आत्महत्या आहे कि दुर्घटना हे अजून स्पष्ट झाले नाही नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच त्या शुद्धीवर आल्यानंतर हे स्पष्ट होईल, सध्यातरी तीनही मुलींची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे.