सरकारने पॉर्न साईट्स वर घातली बंदी, बरेच नेटकरी नाराज, नेमके काय आहे प्रकरण जाणून घ्या !

livelaw.in

सरकारने पॉर्न साइट्स अर्थात अश्लील संकेतस्थळांवर बंदी घालायची ठरवली आणि सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सरकारचे म्हणणे आहे कि स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार यामुळे कमी होतील. मुळात गरज आहे ती लैंगिक शिक्षणाची आणि त्याबद्दल जागरूकतेची. या अशा संकेतस्थळांवर बंदी घालण्यापेक्षा लैंगिक शिक्षणाची आणि त्याबद्दल जागरूकतेची व्याप्ती वाढवण्यावर सरकारने भर द्यावा अशाही प्रतिक्रिया उमटत आहे. सरकारने अश्लील संकेतस्थळांवर घातलेल्या बंदीच्या निर्णयावर वार्षिक सब्स्क्रिप्शन असलेले संकेतस्थळ वापरकर्ते चांगलेच नाराज झाले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे कि सरकारने अशा वेबसाइट्स वर बंदी घालण्या पेक्षा चाइल्ड पॉर्न, रेप पॉर्न व्हिडिओ दाखवणाऱ्या वेबसाइटवर बंदी घालायला हवी.

catchnews.com

सरकारने 800 पेक्षा जास्त अश्लील संकेतस्थळांवर घातलेल्या बंदीचे विरोधासोबतच स्वागतही होत आहे. पॉर्न व्हिडिओ पाहण्याची सवय पुरुषांना महिलांचं लैंगिक शोषण करण्यास प्रवृत्त करू शकते. त्यामुळं सरकारनं घेतलेला हा निर्णय लोकांच्या हिताचाच आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे. पॉर्नहब नावाच्या संकेतस्थळाचे या निर्णयामुळे मोठे नुकसान झाले असे मत या वेबसाइट्स च्या उपाध्यक्षांनी व्यक्त केले या वेबसाईट चा जगातले तिसऱ्या क्रमांकाचे यूजर्स हे भारतातले आहे. हा निर्णय इंटरनेट न्यूट्रॅलिटी च्या विरोधात आहे असे मत अनेकांनी ट्विटर च्या माध्यमातून व्यक्त केले.

indianexpress.com