नोकरी सांभाळून आपल्या बाळाचा सांभाळ करणाऱ्या पोलीस आईस मानाचा मुजरा ! कोण आहे त्या जाणून घ्या !

easytopro.com

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पोलीस आईचा आणि तिच्या बाळाचा फोटो तुम्ही पहिलाच असेल. त्या फोटोमधील महिला हि उत्तर प्रदेश येथील झाशी जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशन मधील महिला कॉन्स्टेबल आहे, तिचे नाव अर्चना सिंग असे आहे. त्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे ती काम करताना दिसत आहे आणि तिचे छोटे बाळ हे टेबलावर झोपले आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. तिच्या बाळाचे वय हे अवघे सहा महिने इतके आहे. तिच्या बाळाला सांभाळण्याची व्यवस्था नसल्याने तिने स्वतासोबतच त्या बाळाला कामाच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. असे असून सुद्धा ती तिच्या कामामध्ये कुठेही कमी पडत नाही असे वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेची दखल घेत आणि सोशल मीडियाचा विचार करत उत्तर प्रदेशच्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी तिची बदली हि तिच्या मूळ गावी केली जेणेकरून ती तिच्या बाळाचा सांभाळ व्यवस्थितरीत्या करू शकेल. यासोबतच तिच्या कामाबद्दलची असलेली निष्ठा बघून तिला रोख बक्षीसही देण्यात आले.