AIIMS च्या सर्वेक्षणात धक्कादायक गोष्ट आली समोर, देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाइलमुळे पीडित !

comune-info.net

मोबाइल आणि इंटरनेटच्या अत्यधिक वापराचे परिणाम हे समोर यायला सुरुवात झाली आहे. एम्सच्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाइल व्यसनाने ग्रस्त आहेत. या अभ्यासात सामान्य जीवनाबद्दल अनेक आश्चर्यकारक खुलासे झाली आहेत जी दर्शवतात की आपले कुटुंब आणि सामाजिक जीवन कसे अधिक जटिल होत आहे. या अभ्यासातील विशिष्ट मुद्दा असा आहे की 13.4 टक्के लोकांनी मान्य केले आहे की मोबाइल तंत्रज्ञानाच्या व्यसनामुळे त्यांच्या नातेसंबंधांवर वाईट परिणाम झाले आहे किंवा यामुळे त्यांनी काही संबंध गमावली पण आहे. त्यापैकी बरेच तरुण आहेत. तथापि, अभ्यासातील सकारात्मक मुद्दा असा आहे की सध्या बरेच लोक मोबाईलमुळे होणाऱ्या व्यावहारिक व्यसनाविषयी जागरूकता वाढवित आहेत.

aconsciousrethink.com

एम्सच्या मनोचिकित्सक आणि व्यावहारिक व्यसनमुक्तीतील तज्ज्ञ यतन पाल सिंह बल्हारा यांनी सांगितले की, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये 817 लोकांवर हा अभ्यास आयोजित करण्यात आला होता. दोन-तृतियांश विध्यार्थी हे पदवीचे शिक्षण घेत होते तर काही विध्यार्थी हे पदवीधर होते. त्यांचे सरासरी वय हे 32.35 वर्षे होते. मोबाईल ऍप्लिकेशन्सच्या अतिरीक्त वापराबद्दल ते किती जागरूक आहे याबद्दल त्यांच्यावर अभ्यास करण्यात आला.

theatlantic.com