एचआयव्ही या आजरापेक्षा आळसाने मरणाऱ्यांची संख्या जास्त, नक्की कारण काय जाणून घ्या !

timeshighereducation.com

इंटरनेट क्रांतीमुळे तसेच औधोगिक क्षेत्रातील कंप्युटर चा वापर यामुळे जीवन खूप स्वयंचलित झाले आहे. मानवी शरीराचे हालचालीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण हे एक सत्य आहे. बऱ्याच लोकांचे स्वप्न असते कि आपले जीवन हे ऐश-आरामात असावे. परंतु आरामासोबतच आपल्या जीवनात व्यायामाचेही तेवढेच महत्व हवे. नियमित व्यायाम, योग किंवा प्राणायाम हा आपल्या नित्य जीवनाचा भाग बनायला हवा. बरेच लोक व्यायाम करण्यात कंटाळा करतात किंवा त्यांना त्यांच्या रोजच्या व्यापातून कसरतीसाठी वेळ मिळत नाही. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि जर हे आपल्या नित्यक्रमाचा भाग असेल तर ते आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. या आळसपणामुळेच लाखो लोक जगात दगावतात हे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. हे जाणून घेणे आश्चर्यकारक वाटेल की एचआयव्हीमुळे मरण पावलेल्या व्यक्तींपेक्षा याचे प्रमाण जास्त आहे.

NewLoveTimes.com

संशोधनातून हे दिसून आले आहे की जे लोक खूप वेळ बसून घालवतात त्या लोकांचे जीवन धोकेदायक आहे. अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये स्थित मायो क्लिनिकचे संचालक डॉ. डॉक्टर जेम्स असे मानतात की एकाच अवस्थेत बसणे किंवा राहणे हे बर्याच आजारांपेक्षा जास्त धोकादायक आहे. नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, भारतात 6 कोटीहून अधिक लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. जवळजवळ आठ दशलक्ष लोक प्री-डायबेटिक आहेत. देशातील मूत्रपिंडाच्या नुकसानीचा सर्वात मोठा कारण मधुमेह आहे. इंटरनॅशनल मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार अपुरी शारीरिक हालचाल होत नसल्यामुळे, जगातील 1.4 बिलियन लोकांचा जीव धोक्यात आहे.

thanhnien.vn