45 सेकंदाच्या अंतरात होते 300 लोकांचे जीवन मरण, अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे वाचले 300 लोकांचे प्राण !

financialexpress.com

काही दिवसांपूर्वीच इंडोनेशिया येथे झालेल्या विमान अपघाताने साऱ्या जगाचे लक्ष वेधले, या अपघातात 189 प्रवाशांचे प्राण गेले. बांग्लादेशच्या एयर स्‍पेस मध्ये तीन दिवसापूर्वी अश्याच एका घटनेची पुनरावृत्ती होण्यापासून टळली. यात 300 लोकांचा जीव टांगणीला लागला होता. फक्त 45 सेकंदाच्या अंतरावर असलेल्या मृत्यूच्या दाढेतून एका अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे इतक्या लोकांचे प्राण वाचू शकले. इंडिगो एरलाईन्स ने या घटनेबद्दल माहिती दिली नाही. या पूर्ण घटनेची माहिती एका एयरपोर्ट अथॉरिटी (एएआई) द्वारे देण्यात आली. एका एयरपोर्ट अथॉरिटी ने सांगितले कि बांग्लादेशच्या हवाई क्षेत्रात इंडिगोच्या दोन विमानांची टक्कर होण्यापासून थोडक्यात बचावले. कोलकाता येथील ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) टॉवर ने एका विमानाला उजव्या बाजूला वळण्यास आणि दुसऱ्या विमानापासून दूर जाण्यास सांगितले, दोन्ही विमाने हे एकाच उंचीवरून जात होते. एका अधिकाऱ्याने प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेतल्यामुळे 300 लोकांचे प्राण वाचले नाहीतर आकाशातूनच जळते शव जमिनीवर आले असते. अगदी हॉलिवूड चित्रपटात दाखवता त्याप्रमाणे प्रसंग येथे घडला.

pilotcareernews.com