पुरुषांची प्रजनन क्षमता कमी करणाऱ्या अशा या घातक सवयी, आजच बदला ! वाचा सविस्तर

powerofpositivity.com

जगभरातील पुरुषांमध्ये पुरुष प्रजनन क्षमता कमी होत आहे. याचे कारण असे आहे की आजकाल आधुनिक जीवनशैली आणि खराब अन्न या सोबतच पुरुषांच्या काही वाईट सवयी आहेत. खराब सवयीमुळे पुरुषांच्या आरोग्यावर परिणाम होत नाही तर त्यांच्या शुक्राणूंची गुणवत्तादेखील खराब होते, परिणामी लहान वयात त्यांच्या प्रजननक्षमतेवर वाईट परिणाम होतो. या चुका टाळण्यासाठी जाणून घ्या अशा कोणत्या वाईट सवयी ज्या आपल्याला बदलण्याची गरज आहे. आपल्या सर्वांसाठी 6-7 तासांची चांगली झोप आवश्यक आहे. जर आपण पुरेशी झोप घेत नसाल तर त्यामुळे बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. अपूर्ण झोप आपल्या रोगप्रतिकार शक्तीस कमकुवत बनवते, ज्यामुळे आपण विविध संक्रमण आणि आजारांना बळी पडतो. या व्यतिरिक्त, यामुळे आपली प्रजनन क्षमता देखील प्रभावित होते, म्हणून रोजची योग्य झोप हि अति महत्वाची मानली जाते.

freshdesignpedia.com

जग हे डिजिटलीकरनाच्या दिशेने वेगाने वाढत आहे. आजकाल जवळजवळ प्रत्येक व्यक्ती मोबाइल आणि लॅपटॉप सारख्या डिव्हाइसेस वापरते. परंतु आपल्याला माहित आहे की हे डिव्हाइस आपल्या प्रजनन क्षमतावर परिणाम करू शकतात? होय, आपण जर लॅपटॉप मांडीवर ठेऊन काम करत असाल किंवा जास्त वेळेसाठी चित्रपट किंवा व्हिडीओ बघत असाल तर त्याचा विपरीत परिणाम हा पुरुषांच्या शुक्राणूंवर होतो. ज्यावेळेस लॅपटॉप मांडीवर ठेवलेला असतो त्यावेळेस लॅपटॉप हा उष्ण होतो, या उष्णतेचा परिणाम पुरुषांच्या अंडाशयावर होतो आणि त्यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होण्याचा धोका वाढतो.

lounge-tek.com

गरम पाण्याचे स्नान हे आपल्या आरोग्यास अनेक मार्गांनी प्रभावित करते. गरम पाणी आपल्या त्वचेला डिहायड्रेट करते, ज्यामुळे लवकरच त्वचा रुक्ष होण्याचा धोका असतो. या व्यतिरिक्त, ते आपली पचनक्रियादेखील खराब करते. पण तुम्हाला माहित आहे की गरम पाण्याने अंघोळ केल्याने आपल्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. अंडकोषांचे तापमान हे संपूर्ण शरीरापेक्षा कमी असावे, म्हणून ते शरीराबाहेर असतात. परंतु संपूर्ण शरीरासह गरम पाण्याने अंघोळ केल्याने, त्यांचे तापमान वाढते, त्यामुळे शुक्राणू प्रभावित होतात. हिवाळ्यात थोडे गरम पाणी घालून, पाण्याचे तापमान आपण सामान्य करू शकतो परंतु ते 25-26 अंश सेल्सियस पेक्षा जास्त नसावे.

Dherbs.com

नोकरी आणि अभ्यासाचे तणाव, अग्रगण्य स्पर्धा आणि आजकाल अनेक लोक तणाव आणि नैराश्याचा बळी पडत आहेत. मानसिक तणाव आणि नैराश्यामुळे आपल्या प्रजनन क्षमतांवर देखील परिणाम होतो आणि यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. म्हणून तणाव दूर ठेवा. यासाठी आपण योग, प्राणायाम, ध्यान, व्यायाम इ. ची मदत घेऊ शकता. तसेच, मित्र आणि मैत्रिणींना बोलणे देखील तणाव दूर करण्याचा एक चांगला मार्ग आहे.

facilitr.com

सिगारेट आणि अल्कोहोलच्या वापरामुळे आपल्याला बरेच गंभीर आणि घातक रोग होऊ शकतात. परंतु सिगारेट आणि अल्कोहोल हे आपल्या संप्रेरकांवर देखील प्रभाव पाडतात, ज्यामुळे पुरुषांमध्ये नपुंसकत्वाचा धोका वाढतो. म्हणून या सवयींपासून दूर राहणे फार महत्वाचे आहे.

dailypost.ng