7 वर्षानंतर सेलिना जेटली चे बॉलीवूड मध्ये लवकरच होणार कमबॅक, ह्या चित्रपटात दिसणार !

SantaBanta.com

दिवंगत अभिनेता फिरोज खान यांच्या ‘जानशीन’ चित्रपटातून 2003 मध्ये बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार्या सेलिना जेटली ने ‘नो एंट्री’, ‘सिलसिला’ सारख्या अनेक चित्रपटांत अभिनय केला होता. 2011 मध्ये, तिने पीटर हॅगशी लग्न केले आणि ग्लॅमरच्या जगापासून स्वतःला दूर ठेऊन ती तिच्या तीन मुलांचे संगोपन करत आहे. परंतु तिच्या चाहत्यांसाठी हि एक आनंदाची बातमी आहे. जवळजवळ 7 वर्षे बॉलीवूडपासून दूर असलेली सेलिना लवकरच चित्रपट उद्योगात पुनरागमन करणार आहेत. अभिनेत्री सेलिना जेटली पुन्हा एकदा बॉलीवूड चित्रपटांमध्ये परत येण्यास उत्सुक आहे. सात वर्षानंतर, सेलिना राम कमल मुखर्जी यांचा हिंदी चित्रपट “ए ट्रिब्यूट टू रितुपर्णो घोष : सीजंस ग्रीटिंग्स’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट मातृ-मुलीच्या नातेसंबंधावर आधारित असेल, ज्यामध्ये सेलिना मुलीच्या भूमिकेत असेल. सेलिनासह आईच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री लिलेट दुबे ह्या दिसतील. चित्रपटात प्रमुख भूमिकेत अजहर खान हे असणार आहे. हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.

Pinkvilla.com