बँगलोर येथे देशातले पहिले बिटकॉईन एटीएम उघडणाऱ्या बिजनेसमॅन ला अटक ! वाचा सविस्तर

Bitcoinist.com

देशातील पहिले बिटकॉइन एटीएम उघडणाऱ्या हरिष बी व्ही यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय रिजर्व बँकेच्या (आरबीआय) नियमांचे उल्लंघन करत काही दिवसांपूर्वी बँगलोरमधील मॉलमध्ये बिटकॉईन एटीएम किओस्क उघडण्यात आला. 37 वर्षीय हरीशने युनिकॉईनची सुद्धा स्थापना केली होती, जे एक प्रतिबंधित क्रिप्टो चलन विनिमयाशी संबंधित होते. हरिश हे कर्नाटकच्या तुमाकुरू चे रहिवासी आहेत. मंगळवारी पोलिसांनी त्यांना अटक केली. इतर गोष्टींबरोबरच, दोन लॅपटॉप, एक मोबाइल फोन, एक क्रिप्टो यंत्र आणि 1.77 लाख कॅश जप्त करण्यात आली आहे. व्हर्चुअल चलनात व्यवसायाच्या दृष्टीने, त्यांनी युनिकॉन टेक्नोलॉजीज प्रा. लि. ची स्थापना केली होती. गेल्या आठवड्यात त्यांनी मॉलमध्ये बिटकॉइन एटीएम उघडला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांना नागरी प्राधिकरना कडून कुठल्याही प्रकारची परवानगी मिळालेली नाही. विशेष म्हणजे, जुलैमध्ये रिझर्व्ह बॅंकेने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की बिटकॉईन सारख्या क्रिप्टो-चालना मुळे अवैध व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल. व्हर्चुअल चलनाच्या वापरावर बंदी संबंधित परिपत्रक सेंट्रल बँकेने केले जाहीर आहे.

timesnow.com