‘बार कोड’ वेब सिरीज लवकरच बॉलीवूड मध्ये हंगामा करणार ! अधिक वाचा

Dumkhum.com

हंगामा प्लेने नुकतेच ‘बार कोड’ नावाची ड्रामा सीरीझ सुरू केली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. पॅनोरामा स्टुडिओजच्या बॅनरखाली अभिषेक पाठक निर्मित, हा शो निर्मितीतील सर्वोत्कृष्ट मानला जाऊ शकतो. शोच्या पहिल्याच भागात हे समजते की या शोमध्ये प्रोडक्शन वर जास्त भर देण्यात आला आहे. भारतीय व्हिडियो स्ट्रीमिंग ऍपमध्ये अमेझॅन आणि नेटफ्लिक्स ची ज्या प्रकारे प्रोडक्शन गुणवत्ता आहे ठीक त्याच प्रकारची प्रोडक्शन गुणवत्ता, ‘बार कोड’ मध्ये बघायला मिळते. एकूणच, असे म्हटले जाऊ शकते की हा वेब शो श्रोत्यांना उत्तम सिनेमॅटिकी अनुभव देईल. लेखक आणि दिग्दर्शक विगेश शेट्टी यांनी या कथेच्या दोन पैलूना चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत. या सिरीज मध्ये विक्की आणि साहिल नावाच्या दोन मित्रांची कहाणी दाखवण्यात आली आहे. ते दोघे मिळून एक नाईट क्लब सुरु करतात आणि त्यानंतर त्यांच्यामधील वाद विवाद, त्यांचे वेगळे होणे आणि दोन नाईट क्लब तयार होणे. दोन नाईट क्लब मधील युद्ध, यात भावनात्मक दृश्ये देखील आहेत ज्यामुळे कथा स्थिर होते. या संपूर्ण कथे मध्ये, नाईटक्लब व्यवसायाचे जग पाहण्याची प्रेक्षकांना संधी मिळते.

televisionpost.com