Sunday, May 20, 2012
Text Size
संच आठवा
संच आठवा

संच आठवा (12)

Friday, 09 November 2007 01:48

शत जन्म शोधिताना

Written by Administrator

शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥

तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥

हा हाय जो न जाई । मिठी घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥


गीत - स्वातंत्र्यवीर सावरकर
संगीत - वझेबुवा
स्वर - पं. वसंतराव देशपांडे
नाटक - सन्यस्तखड्ग (१९३१)

शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला !
साजणा रे, मोहना रे, ऐक ना रे

तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी,
सगेसोयरे मी सांडीले पाठी

मोहन मधुर राती
भराला येऊ दे प्रीती
प्रीतीची हीच न रीती ?
कशाला कुणाची भिती ?
झाडामागे चांद हा वरती आला,
ये ना, ये ना ? आतुर जीव हा झाला;
मी भूलावे, स्वैर व्हावे, गीत गावे !

वाऱ्यात लहर मंद
फुलांचा मादक गंध
मोगरा चमेली कुंद
जीवाला करिती धुंद
माझ्या देही पुनवचांदणे साजे,
प्राणांमध्ये प्रीतीची पावरी वाजे;
आज राया, धुंद काया मोहवाया


गीत - शांता शेळके
संगीत - हेमंत भोसले
स्वर - आशा भोसले

शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा,
पोपट होता सभापती मधोमध उभा.
पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, "मित्रांनो,
देवाघरची लूट, देवाघरची लूट !
तुम्हा-आम्हा सर्वांना एक एक शेपूट
या शेपटाचे कराल काय ?"

गाय म्हणाली, "अश्शा अश्शा, शेपटीने मी मारीन माश्या."

घोडा म्हणाला, "ध्यानात धरीन, ध्यानात धरीन
मीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच करीन,"

कुत्रा म्हणाला, "खुषीत येईन तेव्हा, शेपूट हलवीत राहीन."

मांजरी म्हणाली, "नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही,
खूप खूप रागवीन तेंव्हा शेपूट फुगवीन, शेपूट फुगवीन."

खार म्हणाली, "पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मलाच बंडी."

माकड म्हणाले, "कधी वर, कधी बुडी, शेपटीवर मी मारीन उडी."

मासा म्हणाला, "शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात
पोहत राहीन प्रवाहात, पोहत राहीन प्रवाहात."

कांगारू म्हणाले, "माझे काय?"
"तुझे काय? हा हा हा !
शेपूट म्हणजे पाचवा पाय."

मोर म्हणाला, "पीस पीस फुलवुन धरीन, मी धरीन
पावसाळ्यात नाच मी करीन."

पोपट म्हणाला, "छान छान छान!
देवाच्या देणगीचा ठेवा मान.
आपुल्या शेपटाचा उपयोग करा."

"नाही तर काय होईल?"

"दोन पायाच्या माणसागत, आपुले शेपूट झडून जाईल."


गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - आशा भोसले
चित्रपट - पाहू किती रे वाट (१९६३)

Friday, 09 November 2007 01:43

शूर अम्ही सरदार

Written by Administrator

शूर अम्ही सरदार अम्हला काय कुनाची भीती ?
देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती !

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती !

झुंजावं वा कटुन मरावं हेच अम्हाला ठावं
लढुन मरावं मरुन जगावं हेच अम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू माया ममता नाती !


गीत - शांता शेळके
संगीत - आनंदघन
स्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट - मराठा तितुका मेळवावा (१९६४)

शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा

मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला ?
तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला
अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा
तू असा जवळी रहा

लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा
अंतरीच्या स्पंदनाने अन्‌ थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा

शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी
दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
तू असा जवळी रहा


गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - सुधा मलहोत्रा, अरुण दाते
राग - यमनकल्याण (नादवेध)

Friday, 09 November 2007 00:29

राजा ललकारी अशी दे

Written by Administrator

राजा ललकारी अशी दे हाक दिली साद मला दे

कुंकवाचा माझा धनी बळ वाघाचं आलंया
भरलेल्या मोटंवानी मन भरून गेलंया
ओढ फुलाला वाऱ्याची जशी खूण इशाऱ्याची
माझ्या सजनाला कळू दे

सूर भेटला सूराला गानं आलं तालावर
खुळ्या आनंदचं माझ्या हसू तुझ्या गालावर
भरजरीचा हिरवा शेला पांघरून नवा
शिवार हे सारं खुलू दे

थेंब न्हवं हे घामाचं त्याचं बनतील मोती
घास देईल सुखाचा लई मायाळू ही माती
न्याहारीच्या वखुताला घडीभर इसाव्याला
सावली ही संग मिळू दे


संगीत - अनिल-अरुण
स्वर - अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर
चित्रपट - अरे संसार संसार (१९८१)

Friday, 09 November 2007 00:27

रेशमाच्या रेघांनी

Written by Administrator

रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढीला
हात नगा लावू माझ्या साडीला !

नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूलवेलाची
गुंफियले राघूमोर राघूमोर जोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !

जात होते वाटेनं मी तोऱ्यात
अवचित आला माझ्या होऱ्यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला ?
हात नगा लावू माझ्या साडीला !

भीड काही ठेवा आल्यागेल्याची
मुरवत राखा दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !


गीत - शांता शेळके
संगीत - आनंदघन
स्वर - आशा भोसले
चित्रपट - मराठा तितुका मेळवावा (१९६४)

Sunday, 14 October 2007 21:51

विश्वाचे आर्त

Written by Administrator

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ।
अवघे चि जालें देह ब्रम्ह ॥१॥

आवडीचें वालभ माझेनि कोंदटलें ।
नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥

रखुमादेवीवरू सहज नीटु जाला ।
हृदयीं नीटावला ब्रम्हाकारें ॥३॥


रचना - संत ज्ञानेश्वर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर

Sunday, 14 October 2007 21:48

वंदे मातरम्‌।

Written by Administrator

वंदे मातरम्‌

वंदे मातरम्‌ ।

सुजलां सुफलां मलयजशीतलाम्‌
शस्यश्यामलां मातरम्‌ ।

शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं
सुहासिनीं सुमधुर भाषिणीं
सुखदां वरदां मातरम्‌ ॥
वंदे मातरम्‌ ।

कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले,
कोटि-कोटि-भुजैधृत-खरकरवाले,
अबला केन मा एत बले ।
बहुबलधारिणीं नमामि तारिणीं
रिपुदलवारिणीं मातरम्‌ ॥
वंदे मातरम्‌ ।

तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति
ह्रुदये तुमि मा भक्ति
तोमारई प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे मातरम्‌ ॥
वंदे मातरम्‌ ।

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी, नामामि त्वाम्‌
कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरम्‌ ॥
वंदे मातरम्‌ ।

श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां
धरणीं भरणीं मातरम्‌ ॥
वंदे मातरम्‌ ।


गीत - बंकिमचंद्र चटर्जी
संगीत - पं. विष्णू दिगंबर पलुस्कर

विसरू नको, श्रीरामा, मला
मी तुझ्या पाउली जीव वाहिला,
प्रिया !

किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी
कितीदा नव्याने तुला भेटले मी
तुझी सावली झाले, घेऊनी हिंडले,
सतीचा वसा !

तू सांब भोळा, उमा पार्वती मी
तू कृष्ण काळा, तुझी राधिका मी
युगायुगांचे नाते, आपुले, वेगळे
जुळे श्यामला !

कसे दान आले रित्या ओंजळीत
तुझ्यावीण झाले अभागी, अनाथ
तुझ्या अंकुरासाठी, सोसते, झेलते
उन्हाच्या झळा !


गीत - सुधीर मोघे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - जानकी (१९६९)